अमोल कोल्हे देवेंद्र फडणवीस  Saam Tv
Video

Aurangzeb Tomb: मी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाशी सहमत, औरंगजेबाच्या कबरीवरून खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले?

MP Amol Kolhe: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवरून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

औरंगयाविषयी कुणालाही ममत्व असण्याच काही कारण नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाशी मी सहमत आहे. क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन हे होऊ दिल जाणार नाही किंवा होऊ देऊ नये या विधानाशी सहमत आहे. मात्र, ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्यच प्रतीक आहे, असे अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, जी काय दुर्घटना झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. मी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती करू इच्छीतो की सातत्याने अशी दोन धर्मात वाद निर्माण होतील अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना त्यांनी सक्त ताकीद द्यावी आणि त्याच पद्धतीने इतर राज्यातून येऊन जे महाराष्ट्राचा इतिहासाबद्दल वक्तव्य करतात. अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील कडक शब्दात समज द्यावी. जेणेकरून महाराष्ट्र शांत राहील अशी मागणी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रातील जनतेला ते आवाहन करत म्हणाले, अशा कोणत्याही भडकाऊ विधानांना बळी पडू नका कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, करिअरची होळी होऊ देऊ नका, अशी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो असं अमोल कोल्हे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला राळेगण सिद्ध येथे दाखल..

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT