Maharashtra Politics : शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अमोल कोल्हे म्हणाले, भातुकलीच्या खेळाएवढं सोपं आहे का?

Amol kolhe Statement On Ajit Pawar And Sharad Pawar: दोन राष्ट्रवादी झाल्यापासून काका-पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झालाय. निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मोठा शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला होता
Amol Kolhe
Amol kolhe Statement On Ajit Pawar And Sharad PawarSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, साम प्रतिनिधी

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पु्न्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार हे आमचे दैवत आहे असं म्हणत अजित पवार गटाने दोन्ही पवार एकत्र येण्याविषयी सुचक संकेत दिले होते. या विधानावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. दोन्ही पवार एकत्र येणं हे काही भातुकलीच्या खेळा इतकं सोपं नाहीये, असं म्हणत दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा अमोल कोल्हेंनी एकाच वाक्यात संपवल्या.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार ह्या पंढरपूरला गेल्या होत्या. तेथे विठुरायांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही त्याबाबत सकारात्मक विधान करण्यात आली होती. त्यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते चाकणमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

Amol Kolhe
Maharashtra Politics: भुजबळांना देवेंद्र'बळ'! फडणवीसांनी भुजबळांना उद्देशून केली शेरोशायरी, "मैं अकेला ही चला था.."

हे भातुकलीच्या खेळा इतकं सोपं नाही

अजित पवारांच्या आईने दोन पवार एकत्र येण्यावरुन भाष्य केलं त्यांची इच्छा कौटुंबिक होती. मात्र कौटुंबिक आणि राजकिय अर्थ वेगवेगळे आहे ७६ लाख मतदारांनी पक्ष ,विचारधारेला मतदान केलं या मतदारांनी कोणाच्या तरी विरोधात मतदान केलं. ७६ लाख मतदारांचा विचार गृहीत धरायला हवा दोन पवार एकत्र येणार हे भातुकलीच्या खेळा इतकं सोपं नाही. मतदार कार्यकर्त्याचा विचार करुन शरद पवार योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही यावेळी अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय.

Amol Kolhe
Ajit Pawar News: शरद पवार येणार आहेत, मी येणार नाही; अजित पवारांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना खडसावलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. यावर खासदार कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत चर्चा संपवल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची इच्छा अजित पवारांच्या मातोश्रीची इच्छा कौटुंबिक आहे. आईने इच्छा व्यक्त केली आणि लगेच राजकीय घडामोडी तशाच घडतील इतकं सोपं राजकारणं नाहीये.

शरद पवार आणि छगन भुजबळ एका मंचावर

मंत्रीपद मिळालं नसल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद मिळाले नसल्यानं नाराजी व्यक्त करताना भुजबळ यांनी शरद पवार यांचे कौतुक सुद्धा केलं होतं. अशातच छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही राजकीय डाव आखला जाणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावरही अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं.

महात्मा फुले क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्यासाठी दिलेल्या निमंत्रणामुळे पवार भुजबळ एकत्र आले. त्यावरून राजकीय हेतू समोर न ठेवता दोन्ही नेते एकत्र येतात यात राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं कोल्हे म्हणाले. अजित पवार कार्यक्रमाला का आले नाहीत,यावरही कोल्हेंनी आपलं मत मांडले आहे. अजित पवारांना निमंत्रण देताना मी नव्हता. सामाजिक कार्यक्रमात राजकीय टिपणी योग्य नसल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com