Saree Distribution in Nashik saam tv
Video

Antyodaya Saree Scheme: लाडक्या बहीणींना सरकारची आणखी एक भेट|VIDEO

Timely Execution of Antyodaya Saree Scheme: शासनाच्या अंत्योदय साडी वाटप योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

शासनाच्या अंत्योदय साडी वाटप योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने एकूण १,५२,९१० साड्यांचे यशस्वी वितरण केले असून, हे वाटप एकूण उद्दिष्टाच्या ८६.३४ टक्के इतके आहे.

ही मोहीम वेळेत आणि प्रभावीपणे राबवून हजारो महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर फुलवण्यात जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

राज्य सरकारने अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांतील महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला असून, यावर्षी नाशिक जिल्ह्यातील १,७६,००० लाभार्थ्यांपैकी ८६ टक्के महिलांना साड्यांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित २४,०१४ लाभार्थ्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील २,६०८ रेशन दुकानांमार्फत हे वितरण सुरू असून, ई-पॉस मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंद घेऊन साड्यांचे वाटप केले जात आहे.

गेल्या वर्षी आचारसंहितेमुळे साडी वाटपात आठ महिन्यांचा विलंब झाला होता. यंदा अशा त्रुटी टाळण्यासाठी तालुका अधिकाऱ्यांना वेळेत वितरण पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT