Anna Hajare SaamTv
Video

Anna Hajare : पैशासाठी दारूचा विचार केला, म्हणून त्यांचा पराभव झाला; अण्णा हजारेंची केजरीवाल यांच्यावर टीका | Video

Anna Hajare Criticized आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झालेला आहे. या परभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Saam Tv

जनतेची सेवा करा हे मी त्यांना सुरुवातीपासून सांगत आलो आहे. निष्काम कर्म हा सेवेचा अर्थ असतो. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा अपेक्षा न करता केलेले चांगले कर्म ही ईश्वराची पूजा असते. अशी पूजा तुम्ही करत रहा, तुम्हाला कोणी हटवणार नाही. मात्र सुरुवातीच्या काळात फरक वाटला. नंतर त्यांच्या डोक्यात दारूचे दुकान शिरले आणि त्यातच घोटाळा झाला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या परभवानंतर दिली आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झालेला आहे. या परभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी पैशासाठी दारूचा मुद्दा उपस्थित केला. मी त्यांना वारंवार सांगत होतो. मात्र हे त्यांच्या डोक्यात बसत नव्हते. दारूचे दुकान काढायचे, दारूचे परमिट द्यायचे, हे विचार ज्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात शिरले, त्यावेळी ते डाऊन झाले. जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे. उमेदवारांचे आचार आणि विचार शुद्ध असणे, जीवन निष्कलंक असणे, जीवनामध्ये त्याग असणे सर्वात महत्त्वाचे आहे. मी वारंवार अरविंद केजरीवाल यांना सांगत होतो. मात्र, त्यांच्या डोक्यात गेले नाही. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष दारूचा विचार करतो. त्यामुळे मतदारांनी त्यांना नकार दिला असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. या सर्वातच त्यांचा पराभव झाला असल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT