छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे रायगडावर आले होते. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसेच खासदार सुनील तटकरे व इतर नेते उपस्थित होते. या सोहळ्यानंतर अमित शाहा यांना सुनील तटकरे यांनी आपल्या घरी जेवायला बोलावले होते. या लंच डिप्लोमसीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीयांनी ट्विट करत टीकास्त्र सोडले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, हा फोटो बघून तळपायाची आग मस्तकात गेली.
वेड्यासारखी मरमर मरून सगळ्या दिग्गज राजकारण्यांना शिंगावर घेऊन सिंचन घोटाळा उघडकीस आणला. आयुष्याची बारा वर्षे वाया घातली. स्वतःच्या खिशातले पैसे घालून हायकोर्टात लढले त्यावर भाजपने केवळ राजकारण केलं. देवेंद्र फडणवीस तुम्ही विरोधी पक्षात असताना खूप विश्वासाने तुम्हाला कागदपत्रे दिले होते. या आशेने की तुम्ही त्यांना शिक्षा द्याल. आज ह्याच तटकरेंच्या घरी जेवायला जायला तुम्हाला काहीच वाटले नाही. कुठे गेले चक्की पिसिंग? असे ट्विट करत त्यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल चढवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.