Anant Kalse News SaamTv
Video

President's Rule : 26 तारखेला राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल का? अनंत कळसेंनी काय सांगितलं, पाहा VIDEO!

Maharashtra Assembly Elections : राज्यातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी 15वी विधानसभा स्थापन होणं आवश्यक आहे. नाहीतर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. यावर विधी मंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया देखील महत्वाची असणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन झालं नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडी यांना विधानसभा निकालानंतर 26 नोव्हेंबरच्या अंत स्वत:चं बहुमत सिद्ध करणं बंधनकारक असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर विधी मंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का, निकालानंतर पुढची प्रक्रिया काय असेल याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. कळसे म्हणाले की, '14 व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी 15वी विधानसभा स्थापन होणं आवश्यक आहे. निकल जाहीर झाल्यानंतर त्याची एक प्रत राष्ट्रपतींना सादर करावी लागते. त्यानंतर मुख्य निवडणूक आयोग दिल्लीला एक प्रत सादर करते. त्यानंतर त्यांच्या निर्णयावर एक निविदा काढली जाते. त्यातून 15वी विधानसभा अस्तित्वात आली असं जाहीर केलं जातं. निकालात जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, तर राज्यपाल घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून ज्या पक्षाला सर्वात जास्त मत मिळाले आहेत, त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील', असं अनंत कळसे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kidney Failure Risk: लघवी करताना फेस येतोय? वेळीच व्हा सावध किडनी निकामी झाल्याचे असू शकतं लक्षण

नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा; फडणवीस सरकारकडून शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी माफी, कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

Cough Syrup : कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

Naga Chaitanya : समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य अन् शोभिता धुलिपालाची लव्हस्टोरी कशी फुलली?

SCROLL FOR NEXT