NCP MLA Amol Mitkari speaking about the importance of a strong opposition to protect democracy. Saam Tv
Video

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर... अजित पवारांचा आमदार नेमकं काय म्हणाले? VIDEO

Amol Mitkari Statement On Opposition: अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लोकशाहीत मजबूत विरोधी पक्षाचे महत्त्व अधोरेखित केले. विरोधी पक्ष नसल्यास संसद फक्त शिक्का मारणारी संस्था होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकशाहीत सक्षम आणि परिणामकारक विरोधी पक्षाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे, असे मत त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे मांडले.

सरकारवर नियंत्रण ठेवणारा आणि त्याला जबाबदार धरणारा सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे विरोधी पक्ष. केवळ सत्ताधारी पक्षाचे विचार नव्हे, तर वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे लोकशाही अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ते पुढे म्हणाले की, परिणामकारक विरोधी पक्ष नसल्यास संसद शिक्का मारणारी संस्था बनण्याचा धोका निर्माण होतो. सत्ताधारी आघाडीचा भाग असूनही मिटकरी यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेचे केलेले समर्थन हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT