आमचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. आम्ही सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देतो, त्यामुळे ते आम्हाला आपुलकीने वागवतात, अशी प्रतिक्रिया अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार बालाजी किणीकर यांनी दिली आहे.
आज सकाळी बालाजी किणीकर हे मुंबईकडे निघाले तेव्हा इमारतीच्या खाली आल्यावर त्यांच्या कॉम्प्लेक्समधील नगरीकणी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. यावेळी त्यांच्या अभिनंदनासाठी कॉम्प्लेक्समधील सफाई कामगारापासून, वॉचमन, मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी एकच गर्दी केले दिसली. याबद्दल प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. बालाजी किणीकर हे चौथ्यांदा निवडून आले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची आशा आहे. यावेळी पुढे बोलताना किणीकर म्हणाले की, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अहोरात्र मेहनत केली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही काम केलं. आमच्या विजयाचं श्रेय हे लाडक्या बहिणींना सुद्धा जातं. त्यांच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही पुन्हा सत्तेत आलो आहे, असं म्हणत त्यांनी अंबरनाथ आणि राज्यातील लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केले.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.