बीडमध्ये आज माजी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडची जनता रस्त्यावर उतरली आहे. आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आमदार-खासदारांसह सामान्य जनतेने देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या पत्नी, मुलांसह भावाने देखील सहभाग नोंदवला.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच यांची हत्या होऊन 20 दिवसांच्यावर कालावधी उलटून गेला आहे. तरी या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. या घटनेत तीन आरोपींसह धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं आहे. त्यामुळे या चारही आरोपींना अटक करण्याची मागणी मोर्चेकरींनी केली आहे. तसंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान, या मोर्चात देशमुख यांची कन्या वैभवी हिने देखील उपस्थित मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वैभवीचे भावनिक शब्द ऐकून उपस्थितांचे देखील डोळे पाणावलेले बघायला मिळाले. माझ्या वडिलांचा काही गुन्हा नसताना त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं. त्यांनी शेवटपर्यंत समाजसेवा केली. अखेरच्या दिवसांतही त्यांनी एका दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. त्यानंतर त्यांना हालहाल करून मारण्यात आला. असा प्रसंग भविष्यात कुणावरही येऊ नये असं म्हणत सर्वांनी एक होत माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्याची मागणी वैभवीने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.