Akola Police team after solving the sensational Akshay Nagalkar murder case — nine accused arrested and weapons recovered. Saam Tv
Video

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Akshay Nagalkar Case: अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांडाचं गूढ अकोला पोलिसांनी उकललं आहे. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन देशी पिस्तुलं आणि मानवी अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत.

Omkar Sonawane

अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे.अकोला पोलिसांनी अखेर या हत्येचं गूढ उकललं असून या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नागलकरच्या मारेकऱ्यांनी हत्येसाठी 2 देशी पिस्तूल आणि कोयत्याचा वापर केला होता. कट रचून अकोल्यातील एमएच-30 हॉटेलमध्ये हे हत्याकांड घडवण्यात आलं. हल्ल्यादरम्यान डोळ्यात मिरची पूड फेकून अक्षयवर हल्ला करण्यात आला आणि त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

यानंतर आरोपींनी मृतदेह एका शेतातील टीनाच्या शेडमध्ये जाळून त्याची राख आणि हाडं बाळापूरच्या नदीपात्रात टाकून दिली. पोलिसांनी ही राख आणि हाडं ताब्यात घेऊन DNA तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे.दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 2 देशी पिस्तूलं आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी पुढील तपास अकोला पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT