The broken road near Sonuna village in Akola has left residents struggling to commute amid heavy rains. Saam Tv
Video

Akola News: अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग, चक्क रस्ता गेला वाहून; 'खतरों के खिलाडी' नागरिकांचा धोकादायक प्रवास|VIDEO

Dangerous Travel Route: अकोल्यातील सोणूना गावात घाटरस्ता वाहून गेला आहे. शाळा बसेस येणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे. गावकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे.

Omkar Sonawane

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोणूना गावचा रस्ता पाण्यामूळ वाहून गेलाय. पहाडाच्या मधोमध असलेले सोणूना गाव. तब्बल 200 घरे असलेलं हे गाव. या गावचा मुख्य घाट रस्ता पाण्यामुळे वाहून गेला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी अक्षरशः नदीचे स्वरूप आले. त्यामुळे या सोणूना गावाचा हा रस्ता खडतर झाल्यामूळ येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला जातो आहे.

आता खराब रस्त्यामूळे डोणगाव येथील स्कूल बसेस सुद्धा सोनुना येथे येणे बंद झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विरंजन पडले आहे. गावाच्या बाहेर जाण्यासाठी हा एकच रस्ता असल्यामुळे गावाकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावपासून 20 किमीवर वसलेले सोणूना गाव. येथे डोणगाव आणि आलेगावला जोडण्यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु हा रस्ता काही महिन्यातच उखडल्याचे समजले. डोंगर दर्यातून येणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामूळ येथे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे, त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT