Akkalkot News SaamTv
Video

Akkalkot News : अक्कलकोटला समर्थांच्या दर्शनासाठी लाखों भाविक दाखल; सुट्ट्यांमुळे झाली गर्दी

Tourist Destinations News : नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्या असल्याने पर्यटन स्थळांवर गर्दी बघायला मिळत आहे. धार्मिकस्थळांवर देखील भाविकांनी गर्दी केली असून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले आहेत.

Saam Tv

सलग सुट्ट्या आल्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे. स्वामींचा दर्शनासाठी शनिवारी आणि रविवारी सिंह चौकापर्यंत दर्शन रांग लागली होती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषाने मंदिर परिसर दणाणला आहे. नाताळ सुट्टीमुळे देखील भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने वर्तवली आहे. स्वामी भक्तांची संख्या वाढल्याने देवस्थानचे अन्नछत्राचे भक्तनिवास देखील फुल्ल झाले आहे. श्री स्वामी समर्थ मंदिरा सोबतच शहरातील समाधी मठातही भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा सर्व राज्यातून भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला दाखल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT