Moment when black ink was thrown on Sambhaji Brigade’s Pravin Gaikwad during a felicitation event in Akkalkot. Saam Tv
Video

छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांना काळं फासलं|VIDEO

Black Ink Attack On Pravin Gaikwad: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या सत्कारावेळी काळं फेकण्यात आलं. शिवधर्म फाउंडेशनकडून ही कारवाई करण्यात आली असून स्वामी समर्थ आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय.

Omkar Sonawane

अक्कलकोटमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळं फासण्याची खळबळजनक घटना घडली आहे. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हे प्रकरण घडले. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झालं होतं. त्याचबरोबर, स्वामी समर्थांचा देखील एकेरी उल्लेख करून अवमान केल्याचा आरोप करत शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर याआधी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडविरोधात उपोषण देखील केलं होतं. दरम्यान, आज अक्कलकोटमध्ये गायकवाड यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमातच त्यांच्यावर काळं फेकण्यात आलं, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT