Ajit Pawar on sharad pawar  
Video

Beed : चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या| VIDEO

Ajit Pawar on sharad pawar : अजित पवार यांच्या वक्तव्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली. चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, असे वक्तव्या अजित पवार यांनी बीडमध्ये केले होते. त्यानंतर राजकीय चर्चेला पुन्हा सुरू झाली.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar Beed Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बीड दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवारांचे कौतुक केलेच, पण चुलत्याच्या कृपेमुळे बरे चाललेय, असे वक्तव्य केले, त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार यांनी विरोधातच राहण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना दिले होते. त्यानंतर बारामतीमधून पवार कुटुंबातच लढत झाली होती. लोकसभेला शरद पवार यांनी बाजी मारली होती, तर विधानसभेला अजित पवार यांनी हिशोब चुकता केला होता.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीगाठीवरून काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता अजित पवार यांनी बीडमध्ये केलेल्या वक्तव्याने नव्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

आई-बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने सर्व बरं चाललं आहे. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या.माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा.. पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता, त्याचा इतिहास आठवा अन् म्हणा मी कुणाच्या पाया पडलो. आई-बाप, गुरूच्या पाया पडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT