Ajit Pawar on NCP together saam tv
Video

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही; अजित पवार सुप्रिया सुळेंबाबत काय म्हणाले? VIDEO

ajit pawar rejects ncp merger speculation : महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होतील आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल, या चर्चांना अजित पवार यांनी स्वतः पूर्णविराम दिला आहे. काय म्हणाले अजित पवार ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून....

Nandkumar Joshi

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित महापालिका निवडणुका लढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींचे नेते एकाच व्यासपीठावरून प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. याबाबत अजित पवारांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण आणि खासदार सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. या दोन्ही चर्चांना स्वतः अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही. ते इंडिया आघाडीत आहेत. आम्ही एनडीएत आहोत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं काही नाही, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अदानींचं विमानतळ, भरकटलेलं राजकारण अदानींचं साम्राज्य वाढण्यामागचं कारण काय?

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT