Deputy CM Ajit Pawar after being unanimously re-elected as Maharashtra Olympic Association President for the fourth consecutive term. Saam Tv
Video

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड|VIDEO

Maharashtra Sports Association Election: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा एकमताने निवड झाली आहे. क्रीडा सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील दोन वर्षे काम करणार आहेत.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. ३१ सदस्य संघटनांपैकी २२ पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवडले गेले.

महायुतीतील समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदे देण्याचे ठरले. या निवडणुकीत पवार यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले असून, क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील दोन वर्षे काम करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT