Agniveer Permanent Soldier: परमनंट व्हायचंय? अग्निवीरांनो लग्न विसरा! अग्निवीरांसाठी आता नवा मापदंड

Agniveer Permanent Recruitment: कायमस्वरूपी नोकरीसाठी भारतीय सैन्याने नवीन मानके लागू केली आहेत. पात्रता प्रक्रियेबद्दल कोणते बदल करण्यात आली आहेत ते जाणून घेऊ.
Agniveer Permanent Recruitment:
Indian Army announces new parameters for Agniveer permanent recruitment; clarity on eligibility rules.saam tv
Published On
Summary
  • अग्निवीरांच्या कायम नियुक्ती प्रक्रियेत नवे मापदंड लागू

  • परफॉर्मन्स, वैद्यकीय तंदुरुस्ती आणि शिस्त यांना मोठं महत्व

  • सर्व अग्निवीर कायम होणार नाहीत, पात्रतेनुसार निवड

2022 मध्ये भारतीय लष्करात दाखल झालेल्या अग्निवीरांची पहिली तुकडी यावर्षी सेवा कालावधी पूर्ण करतेय.त्यामुळे हजारो अग्निवीरांच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येतय. अशातच भारतीय लष्करानं अग्निवीरांना कायमस्वरुपी सैनिक बनण्याच्या प्रक्रियेत नवे मापदंड लागू केलेत. हे नवे मापदंड काय आहेत? पाहूयात.

Agniveer Permanent Recruitment:
चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

अग्निवीरांनो परमनंट व्हायचंय, लग्न विसरा

नोकरीत कायमस्वरूपी होण्यासाठी लग्न करता येणार नाही

परमनंटची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणं बंधनकारक

लग्न केल्यास कायमस्वरूपी नियुक्तीसाठी अपात्र

सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लगेच लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही

नियमांची पायमल्ली केल्यास प्रक्रियेतून थेट बाहेर काढणार

केवळ 25% उमेदवारांनाच कायमस्वरूपी नोकरी

दरम्यान भारतीय लष्कराच्या या नियमावर सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे? पाहूयात.

Agniveer Permanent Recruitment:
8th Pay Commission: 8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; कर्मचाऱ्यांना थकबाकीचे किती पैसे मिळणार? समजून घ्या संपूर्ण गणित

अग्निवीरांना साधारणपणे वयाच्या 21 व्या वर्षांपर्यत सैन्यात भरती केलं जातं.. तर वयाच्या 25 वर्षी त्यांचा सेवा कालावधी समाप्त होत असतो. अशावेळी कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट होईपर्यंत लष्काराची शिस्त आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. अशातच अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याच्या नियमामुळे अग्निवीरांपुढे नवाच पेच निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com