Political leaders react as questions arise over the mysterious circumstances of Ajit Pawar’s plane crash. Saam Tv
Video

अजित पवारांच्या विमानाचा पायलट नशेमध्ये? देशाच्या राजकारणाला हादरा|VIDEO

Ramdas Kadam Raises Serious Questions Over Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असून पायलट नशेत होता का? घातपात की अपघात? रामदास कदम यांच्या विधानानंतर संशय अधिक गडद होत चालला आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकारणातच नाही तर राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुधवारी 28 जानेवारी रोजी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला सकाळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. मात्र त्यांचे विमान हे बारामतीच्या आसपासच क्रॅश झाले आणि अजितदादांसह सहा जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता हा अपघात होता कि घातपात असा दाट संशय सत्ताधारी नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे सुरुवातीपासून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत आहे. तर रूपाली ठोंबरे पाटील यांनीही दोन्ही पायलट कसे ट्राफिकमध्ये एकाचवेळी अडकता आणि ऐनवेळी पायलटमध्ये बदल करण्यात येतो असे म्हणाल्या होत्या. तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विमानात बॉम्ब होता का असा सवाल उपस्थित केला. आता शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, एखादे विमान जेव्हा लँड होते. तेव्हा ते सरळ खाली येते असं उभं नाही येत आणि हे विमान वाकडं खाली आलं. वरतीच काही बिघाड झाला का? की पायलट नशेमध्ये होता का? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT