Deputy CM Ajit Pawar addressing BDD Chawl residents during redevelopment event in Mumbai Saam Tv
Video

Ajit Pawar: मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे- अजित पवार नेमकं काय म्हणाले? VIDEO

History Of BDD Chawls And Redevelopment Plans: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांनी मुंबईतच राहावं, नवीन घरे विकू नयेत आणि संस्कृती जपावी,अशी विनंती केली.

Omkar Sonawane

अजित पवारांचे मराठी माणसांनी मुंबईतच राहण्याचे आवाहन

नवीन घरं किमान 10-15 वर्ष विकू नयेत, अशी सूचना

टॉवरमधील घरांची गुणवत्ता उत्तम असल्याचा विश्वास

बीडीडी चाळींच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख

बीडीडी चाळींचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीचे साक्षीदार असलेल्या या चाळींमध्ये, बलिदान देणाऱ्या अनेक हुतात्म्यांचे वास्तव्य होते. आता या चाळींचे टॉवरमध्ये रूपांतर होत असले, तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. संपूर्ण आयुष्य तुम्ही येथे व्यतीत केले आहे; ही घरे तुमचीच आहेत. कोणत्याही मोहाला बळी पडू नका.

मुख्यमंत्री महोदय घराच्या चाव्या देत असताना, किमान 10 ते 15 वर्षे ती घरे विकता येणार नाहीत, अशी अट घालावी, जेणेकरून खऱ्या मुंबईकरांना मुंबईतच राहता येईल. कष्टकरी माणूस शहराबाहेर जाऊ नये; मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे. प्रत्येक गोष्ट उत्तम दर्जाची वापरली गेली आहे. या चाळीत नवीन घरांसोबत उत्तम सुविधा द्याव्यात. हा तुमच्या कष्टांचा ठेवा आहे, तो काहीही झालं तरी विकू नका, ही नम्र विनंती आहे.

माझं एकच सांगणं आहे. इथे जॅग्वारचे नळाचे कॉक लावले आहेत, छोटे-छोटे नट देखील उत्तम दर्जाचे वापरले आहेत. हे घर शंभर वर्ष टिकेल, असा विश्वास दिला आहे. उर्वरित चाळी पाडून दिल्यास चार वर्षांत घरे देण्याची जबाबदारी आमची असेल, असे टॉवर बांधणाऱ्यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT