Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar : अजित पवार यांची ईडी चौकशी सुरूच राहणार? मोठी अपडेट आली समोर | VIDEO

Ajit Pawar ED Enquiry News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्राप्तीकर विभागाने क्लीनचिट दिली असली तरी त्यांच्यावर सुरू असलेली ईडीची तपासणी सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Saam Tv

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडी चौकशी ही सुरूच राहाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या विरोधात ईडीचा तपास बंद होणार नाही आहे, असंही सूत्रांनी माहिती दिली आहे. सिंचन आणि बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून अजित पवार यांची चौकशी सुरू आहे. ती यापुढेही सुरूच राहणार आहे. ईडीकडून याबद्दल अजूनही क्लोजर रिपोर्ट आलेला नाही. तर बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तीकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली आहे. तरीसुद्धा अजित पवार यांची ईडी चौकशी मात्र सुरूच राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंचन घोटाळा आणि सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. एकीकडे २ दिवसांपूर्वीच अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आलेली होती. मात्र आता ईडीची चौकशी सुरूच राहणार असल्याने अजित पवार यांचा त्रास अद्यापही संपलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT