ajit pawar  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजने संदर्भात अजित पवारांच महत्वाचं विधान, VIDEO

Ajit Pawar Assures : कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Omkar Sonawane

आमच्याकडे पाच वर्ष आहेत.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.थोडीशी ओढाताण होत आहे. मात्र त्यावर मार्ग काढल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याच्या सुचना पवार यांनी केल्या.दरम्यान भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीचे आमदार निवडून यायला हवे अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते ही या योजणेमुळे सरकार तोट्यात जात आहे यामुळे ही योजना लवकरच बंद होईल असे अनेकजन सांगत होते.यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराम लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : डोक्यावर हातोड्याने वार करत बायकोची हत्या, दुसऱ्या दिवशी आढळला झाडाला लटकलेला नवऱ्याचा मृतदेह

Nashik Police Bulldozer Action:नाशिकमध्ये 'उत्तर प्रदेश' पॅटर्न, बड्या राजकीय नेत्याचं साम्राज्य जमीनदोस्त; कारण काय?

Talathi Bharti: तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

SCROLL FOR NEXT