Deputy CM Ajit Pawar addressing media on revised school timings due to rising leopard sightings in Maharashtra. Saam Tv
Video

Ajit Pawar: राज्यात बिबट्याची दहशत, शाळेच्या वेळेत बदल; काय आहे नवीन वेळापत्रक? VIDEO

Maharashtra Schools Adjust Timings: अजित पवार यांनी राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या धोक्यामुळे शाळांची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी बदलण्याची घोषणा केली आहे.

Omkar Sonawane

राज्यामध्ये सर्वत्र सध्या बिबट्याने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यामुळे अनेकांनी आपले जीव गमवले. दोन दिवसांपूर्वी देखील नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेमध्ये बिबट्या दिसल्याचे सांगितल्याने शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालायची मान्यता मिळाली आहे असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी सांगितले.

अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शाळा परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढल्याने 9.30 ते 4 ही शाळेची वेळ असणार आहे. तसेच थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार असून बिबट्या संदर्भात तोडगा निघणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT