पुण्यात अजित पवार गटाला जबरदस्त धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून बड्या नेत्यानं सोडली साथ

Senior NCP Leader Leaves Party Pune: प्रदीप गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा देणार आज राजीनामा.
Senior NCP Leader Leaves Party Pune
Senior NCP Leader Leaves Party PuneSaam
Published On
Summary
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात धक्का

  • पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आज देणार राजीनामा

  • स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा

सचिन जाधव, साम टिव्ही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडत आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या गटाला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर नाराज असल्याची चर्चा होती. निष्ठावनांना डावले जात असल्याचा आरोप प्रदीप गारटकर यांनी केला. स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. गारटकर हे स्वत: इंदापूर नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Senior NCP Leader Leaves Party Pune
भाजपाला मोठा धक्का! बड्या नेत्याकडून ऐन निवडणुकीत रामराम, काँग्रेसच्या 'हाता'ला दिली साथ

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गारटकर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, हर्षवर्धन पाटील, स्थानिक आघाडी एकत्र करून प्रदीप गारटकर इंदापूरमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

Senior NCP Leader Leaves Party Pune
मुंबईतील नामांकित शाळेत भयंकर घडलं; ३ विद्यार्थिनींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे अश्लील वर्तन, नेमकं घडलं काय?

प्रदीप गारटकर हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळले होते. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते राजीनामा देणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जाणार असल्याची शक्यता आहे. पुण्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com