मुंबईतील नामांकित शाळेत भयंकर घडलं; ३ विद्यार्थिनींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे अश्लील वर्तन, नेमकं घडलं काय?

Vile Parle Shock: मुंबईतील विलेपार्ले येथे भयंकर घडलं. नामांकित शाळेतील तीन विद्यार्थिनींसोबत विनयभंगाचा प्रकार. व्हॅन चालकाला बेड्या ठोकल्या.
Vile Parle Shock
Vile Parle ShockSaam Tv News
Published On
Summary
  • विलेपार्ले येथील तीन शाळकरी मुलींचा विनयभंग

  • स्कूल व्हॅन चालकाला अटक

  • अल्पवयीन मुली नामांकित शाळेत शिकतात

मुंबईतील विलेपार्ले येथील नामांकित शाळेतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. पालकांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

विलेपार्ले येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनींसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. स्कूल व्हॅन चालकाने तीन शाळकरी मुलींचा विनयभंग केला आहे. तीन शाळकरी विद्यार्थिनींसोबत स्कूल व्हॅन चालकाने अश्लील वर्तन केले आहे.

Vile Parle Shock
आईच्या मैत्रिणीवर जीव जडला, आधी प्रेम नंतर बसमध्ये हत्या; मृतदेहाचे तुकडे करून गटारात फेकले

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींना व्हॅनमध्ये बसवताना चालक गैरवर्तन करायचा. तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. तीन शाळकरी विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणाची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच त्यांना राग अनावर झाला. सांताक्रूझ येथील महिलेनं पोलीस ठाणे गाठले. पालकांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

Vile Parle Shock
बिहारच्या विजयानंतर भाजप ऑन अ‍ॅक्शन मोड; माजी मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी, नेमकं कारण काय?

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर जुहू पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. आरोपीनं आणखी कोणत्या विद्यार्थीनीचा विनयभंग केला आहे का? आरोपीवर याआधी कोणता गुन्हा दाखल होता का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com