Air India Plane Saam TV
Video

Air India Plane Incident : एअर इंडिया विमानानं नियंत्रण गमावलं, लँडिंगनंतर चाक रनवेबाहेर | VIDEO

Kochi To Mumbai : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला लँडिंगदरम्यान मोठा धक्का बसला. नियंत्रण सुटल्यामुळे विमानाचं चाक थेट धावपट्टीबाहेर गेलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला लँडिंगदरम्यान मोठा धक्का बसला आहे. विमानाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्याचं एक चाक थेट धावपट्टीबाहेर गेलं. या प्रकारामुळे काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.घटनेदरम्यान वैमानिकांनी प्रसंगावधान राखून विमान थांबवलं, त्यामुळे मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून, अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी विमानाचं तांत्रिक परीक्षण केलं जात आहे.या प्रकारामुळे काही वेळ मुंबई विमानतळावरील उड्डाणे आणि लँडिंग सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Maharashtra Live News Update: अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, जरांगेंनी दिला इशारा

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

Maratha Andolan : मराठा आंदोलकांवरील ८२६ पैकी केवळ ८६ गुन्हे मागे | VIDEO

SCROLL FOR NEXT