AIMIM corporator Matin Patel faces police action in Nashik conversion case linked to accused Nida Khan. saam tv
Video

TCS धर्मांतरण प्रकरणी एमआयएमच्या नेत्याला पोलिसांची नोटिस|VIDEO

Aimim Leader Matin Patel Notice Nashik Conversion Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सोमवारी ते पोलिसांसमोर हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेने नोटिस पाठवली आहे. सोमवारी पटेल नाशिक शहर पोलिसांसमोर हजर राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मतीन पटेल याच्या विरोधात आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतीन पटेलच्या शोधार्थ पथक संभाजीनगरमध्ये होते. मात्र तो सापडला नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पथकाने पटेल यास नोटिस पाठवली. नोटिस मिळताचा तो हादरला असून सोमवारी तो नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निदा खानला आश्रय देणे मतीन पटेलला चांगलेच भोंवले असून काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरावर, ऑफिसवर आणि निदा खान ज्या ठिकाणी लपलेली त्या ठिकाणी संभाजीनगर महापालिकेने बुलडोझर चालवून त्याचे सर्व साम्राज्य उद्ध्वस्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर

Gopinath Munde: गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Liver health: लिव्हर खराब होण्यापासून वाचवायचंय? सकाळपासून रात्रीपर्यंत आहारात या पदार्थांचा समावेश करा, डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लॅन

'पंतप्रधान मोदींना भेटलो अन् चर्चा रंगल्या...'; NDA मध्ये जाणार की नाही? शरद पवारांनी बैठकीत स्पष्टच सांगितलं

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये 2% वाढ, थकबाकीसह मिळणार बंपर लाभ

SCROLL FOR NEXT