AIMIM leaders after announcing the first list of candidates for the Jalna Municipal Corporation elections. Saam Tv
Video

'या' पक्षाची यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू? VIDEO

AIMIM First Candidate List For Jalna Municipal Elections: जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच एमआयएमने निवडणूक तयारीला वेग दिला आहे.

Omkar Sonawane

जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच एमआयएमने मात्र निवडणुकीच्या रणांगणात आघाडी घेतली आहे. एमआयएमने जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आतापर्यंत जिल्हाध्यक्षांसह आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

एमआयएमकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत प्रभाग क्रमांक 11 मधून तीन उमेदवार, प्रभाग क्रमांक 4 मधून दोन उमेदवार, प्रभाग क्रमांक 10 मधून दोन उमेदवार तर प्रभाग क्रमांक 15 मधून एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपावर एकमत होत नसताना एमआयएमने उमेदवार जाहीर करून निवडणूक तयारीला वेग दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जालन्यातील महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

जैन बांधव शिवसेनेसोबत, फडणवीसांच्या जवळ गद्दार नेते

Maharashtra Politics: शिंदे गटात अंतर्गत नाराजी उफाळली; उल्हासनगरमधील 200 हून अधिक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

चर्चेच्या फेऱ्या सुरु, घोळ संपता संपेना, भाजप शिंदेसेनेचे इच्छूक गॅसवर?

SCROLL FOR NEXT