Sanjay Raut News Today Saam TV News
Video

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Sanjay Raut News Today: संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल, नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Saam TV News

संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अहमहनगरमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी 8 मे रोजी अहमदनगर मध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केलेला. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? असा एकेरी उल्लेख देखील संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या वक्तव्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 171( क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT