ahmednagar robbery cctv Saam tv
Video

Nagar Robbery : दिवसाढवळ्या थरार! ज्वेलर्सवर दरोडा; पाहा VIDEO

ahmednagar robbery cctv video : नगरमध्ये भरदिवसा गोळीबार करून लाखोंचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. दरोडोखोरांनी लाख रुपये लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अहिल्यानगर : नगरमध्ये भरदिवसा दरोडा झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर गावात ही घटना घडली आहे. ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

साकूर गावात चार ते पाच जणांनी दुकानात प्रवेश करत मोठी लूट केली आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. ही दरोड्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. रक्कम लुटून बाहेर पडल्यावर हवेत गोळीबार करत चोरटे पसार झाले आहेत. दुचाकीवरून चोरटे आले होते. दरोड्यानंतर चोरटे पारनेरच्या दिशेने पळाले. पोलीस घटनास्थळी दाखल पोहोचले आहेत. दुकानातून नेमका किती मुद्देमाल गेला, हे फिर्याद दाखल झाल्यावर समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार; संभाव्य तारीख आली समोर, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra News Live Update: मंत्रालयात दूषित पाणी प्यायल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांंना उलट्यांचा त्रास

LPG, Petrol Price: पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारनं दिली स्पष्ट माहिती

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

SCROLL FOR NEXT