Air India Crash saam tv
Video

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २४२ जणांचा मृत्यू, विजय रूपाणींचाही समावेश असल्याची शक्यता|VIDEO

All 242 Onboard Dead: अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना घडली होती. अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरातील घोडा कॅम्पजवळ गुजसेल विमानतळाजवळ ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. यादरम्यान शहरात लांब लांब पर्यंत धुराचे लोट दिसू लागले आणि परिसरातील रहिवाशांमध्ये भीती देखील पसरली होती. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं.

उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघानी नगर जवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानी नगरचं अंतर 15 किलोमीटरचं आहे. या विमानात 242 प्रवासी होते. घटना झाल्यापासून किती लोकांचा यामध्ये मृत्यू झाला याची माहिती स्पष्ट होत नव्हती. आता मात्र याबाबत माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एपी या वृत्तसंस्थेनुसार 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT