NCP leader Arun Jagtap Pune hospital  Saam TV News
Video

Arun Jagtap : नगरकरांचे 'काका' हरपले, अरुण जगताप यांचं निधन

Arun Jagtap passed away : अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे पुण्यात निधन झाले. आज दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Namdeo Kumbhar

Former MLA Arun Jagtap passed away : अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे पुणे येथे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम येथे दुपारी चार वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. अरुण काका जगताप हे 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.

माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT