Supporters celebrate as Ajit Pawar faction registers its first unopposed victory ahead of municipal elections. Saam Tv
Video

भाजप पाठोपाठ आता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं उघडलं खातं, मतदानाआधीच उधळला विजयाचा गुलाल|VIDEO

Ajit Pawar Faction First Win Before Municipal Elections: भाजपनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही महापालिका निवडणुकीआधीच पहिले खाते उघडले आहे. अहील्यानगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Omkar Sonawane

भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील राज्यात पहिले खाते उघडले आहे. अहिल्यानगर महापालिकेचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8 ड बिनविरोध निवड झाली आहे. कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध झाला होता. पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल भाजपचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते. कल्याण डोंबिवली, पनवेल आणि धुळे या महापालिकेत भाजपने खाते उघडले. त्यांनंतर आज अजित पवार गटाने पहिले खाते उघडल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT