Aaditya Thackeray addressing the media in Mumbai, alleging the presence of nearly 14 lakh bogus voters in the city’s electoral roll. Saam Tv
Video

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

Aditya Thackeray Allegations On Fake Voters: मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल १४ लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मृत मतदारांची नावे, डुप्लिकेट नोंदी आणि नव्या समावेशांतील अनियमितता त्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या.

Omkar Sonawane

मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाचा आकडा ११ लाख होता, जो आम्हाला आकडा सापडला तो साधारणपणे १४ लाख आहे असा दावा ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला. १ जुलै २०२५ नंतर यादीत ३२ ते ३३ हजार नवीन मतदार समाविष्ट झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मृत मतदारांची नावे आणि एकाच व्यक्तीचे नाव अनेकदा आल्याचे पुरावे त्यांनी मांडले. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत सिनेट सदस्य परम यादव आणि मिलिंद साटम उपस्थित होते. निवडणूक आयोग आणि बीएमसी प्रशासनावर त्यांनी सडकून टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक - मतदान आणि निकाल - संपूर्ण वेळापत्रक

Eyebrow Growth: दाट भुवयांसाठी महागडी आयब्रो पेन्सिल कशाला? पटकन करा हा सोपा उपाय, डोळे दिसतील रेखीव

Crime News : धक्कादायक! क्रूर आई-बापानंच केली पोटच्या ६ वर्षांच्या मुलीची हत्या, कारण वाचून डोक्यात तिडीक जाईल

Mardaani 3: लाल डोळे, चेहऱ्यावर राग मर्दानी ३ मध्ये क्रूर अम्माची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण?

प्रभागात वाटले शिक्षकांना हाताशी धरून चांदीचे जोडवे! अजित पवारांच्या महिला उमेदवारावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT