Aditi Tatkare SaamTv
Video

Ladki Bahin Yojna : तक्रार आली तर.., लाडकी बहीण योजनेच्या स्क्रूटिनीबाबत आदिती तटकरेंचं मोठं विधान

Aditi Tatkare News : लाडकी बहीण योजनेत छाननी केली जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबद्दल आज माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजवणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरून सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजनेत स्क्रूटिनीचा प्रश्नच कुठे येत नाही. माझ्या कार्यकाळात एकही तक्रार आली नाही. आता आली असेल तर माहिती नाही. तक्रारी आल्या तर स्क्रूटिनी कशी करायची यासंदर्भातला निर्णय शासन करेल, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेबाबत चुकीच्या पद्धतीने बातमी देण्यात आली आहे. २ कोटी ४० लाख महिलांपर्यंत लाभ पोहोचतो आहे. अडीच लाखांहून कमी उत्पन्न असल्या पेक्षा महिलांना लाभ मिळतोय. कोणती स्पेसिफिक तक्रार आली तर त्याचीच चौकशी करायची की नाही यासंदर्भात शासन निर्णय घेईल. यात स्क्रूटिनीचा प्रश्नच कुठे येत नाही. तक्रारी आल्या तर स्क्रुटिनी कशी करायची यासंदर्भातला निर्णय शासन करेल. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यानंतर बोलताना देखील त्यांनी सांगितले २१०० रुपयांचा लाभ कॅबिनेट बैठकीत ठरेल. काही अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांना नेहमीच हो योजना डोळ्यात खुपली आहे. ते संभ्रम पसरवतात, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT