Actress Khushi Mukherjee loses her temper in Andheri after a minor car accident; throws firecrackers on the road, creating chaos. saam tv
Video

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Actress Khushi Mukherjee : अभिनेत्री खुशी मुखर्जीने मुंबईतील अंधेरी लोखंडवाला येथील रस्त्यात मोठा गोंधळ घातला. तिच्या कारला रिक्षाने धडक दिल्यानंतरने फटाके विक्रेत्याच्या दुकानातील फटाके रस्त्यावर फेकले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Bharat Jadhav

संजय गडदे, साम प्रतिनिधी

"करुन गेलं गाव आणि आलं रावचं नाव" अशी म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल, त्याची प्रचिती अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरातील लोकांना आली. येथे एका अभिनेत्रीने भररस्त्यात राडा घातलाय. अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या कारला एका रिक्षावाल्यानं धडक दिली. त्याचा राग अभिनेत्रीनं एका फटाके विक्रेत्यावर काढला. रागाच्या भरात मुखर्जीने जवळच असलेल्या फटाके विक्रेत्यांच्या दुकानातील फटाके रस्त्यावर फेकून दिले.

प्रत्यक्षदर्शींनुसार, फटाके विक्रेते रस्त्यावरच अनधिकृतपणे स्टॉल लावून विक्री करत होते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता. अपघातानंतर रागाच्या भरात खुशी मुखर्जीने विक्रेत्यांवर संताप व्यक्त करत फटाके फेकून दिल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांनी ठिकाणी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून, दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण घेतले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

Pineapple Benefits: हिवाळ्यात अननस खाल्ल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवण्याचं रहस्य, आचार्य चाणक्यांचे ५ मंत्र बदलतील तुमचं करिअर

सांगली महापालिकेसाठी अजितदादांनी डाव टाकला; निम्या जागांवर दावा ठोकला, महायुतीची मोट कशी बांधली जाणार?

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून शिंदेसेनेच्या जिल्हा प्रमुखाने पुन्हा भाजपला डिवचले

SCROLL FOR NEXT