Thane Municipal Corporation News Saam tv
Video

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Thane Municipal Corporation News : ठाणे महापालिकेत ACBचा छापा टाकण्यात आलाय. त्यांच्या कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु आहे.

Saam Tv

ठाणे महापालिका मुख्यालयात मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा टाकण्यात आला आहे. ठाणे महापालीका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात हा छापा टाकण्यात आला आहे. मागील दोन तासांपासून तपास सुरू आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शंकर पाटोळे यांची चौकशी सुरू आहे.

अभिराज डेव्हलपर्सच्या अभिजीत कदम यांच्याकडून घोडबंदर रोड या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी असलेला अतिक्रमण हटविण्यासाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. याअंतर्गत 15 लाख रोख आणि 10 लाख रुपये एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यात घेऊन काम न केल्याने अभिराज डेव्हलपरच्या अभिजीत कदम यांनी तक्रार केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT