Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Akola News : अकोल्यातील कौलखेड भागात नशेत असलेल्या तरुणांनी नागरिकांवर चाकू आणि पाईपने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video
Akola NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यात टोळीचा दिवसाढवळ्या हल्ला

  • नशेत तरुणांनी चाकू व पाईपने हल्ला केला

  • दोन नागरिक गंभीर जखमी

  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

अक्षय गवळी, अकोला

नांदेडमधील गँगवॉरची घटना ताजी असतानाच आता अकोल्यातील कौलखेड भागात एका टोळीने काही नागरिकांना चाकू भोसकून दहशत निर्माण केली. या दुर्घटनेत दोघांची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक म्हणजे हे तरुण धुरंदर टू चित्रपट बघून आल्यानंतर नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील कौलखेड भागातील श्रद्धा नगर ३ येथे एका टोळीने दिवसाढवळ्या धुमाकूळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी नुकतीच धुरंदर २ हा चित्रपट पाहून आली होती. शिवाय हे टोळीतले गुंड नशेत होते.

या गुंडानी चाकूने नागरिकांवर हल्ला केला, तर काहींवर पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात अभिलाष अरविंद हिंगे (वय ३२), रवि उर्फ छोटू ठाकरे (वय २४) हे गंभीर जखमी झाले. अभिलाष अरविंद हिंगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video
Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि एलसीबीचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. अकोल्यातील खदान पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील कौलखेड आणि इतर भागात नशेखोर तरुणांची दहशत वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com