Manasvi Choudhary
मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे मान दुखणे ही समस्या उद्भवू लागली आहे. अनेकदा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांकडून तुम्ही ही तक्रार ऐकलीच असेल.
ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करणारे तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मानेचा त्रास अधिक होतो. एकाच जागी तासनतास बसून जे लोक काम करतात त्यांना हा त्रास होतो आहे.
स्मार्टफोन आणि लॅपटॉपमुळे मानदुखीचा त्रास होत असेल तर, या 5 सवयी आजपासूनच सोडा
जर तुम्ही बराच वेळ लॅपटॉपवर बसून काम करत असाल किंवा मोबाईल फोनचा वापर करत असाल तर वाकून बसून नका सरळ बसा यामुळे मानेवर ताण येऊ शकतो.
कामाच्या दरम्यान दर तासाला मानेचे गोल फिरवणे किंवा बाजूला झुकवणे असे साधे व्यायाम करा.
मोबाईल वापरताना तो खाली न धरता डोळ्यांच्या समोर धरा. लॅपटॉप वापरताना त्याचे स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या समांतर असेल याची काळजी घ्या, जेणेकरून मान झुकवावी लागणार नाही.
दर २० मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवा दुसऱ्या वस्तूकडे २० सेकंद पहा. यामुळे डोळ्यांसोबतच मानेच्या स्नायूंनाही विश्रांती मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.