Nashik Onion News Saam Tv
Video

Nashik News : नाफेडचे वरिष्ठ अधिकारी थेट पिंपळगावात !

Nafed Onion News : नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा घोटाळ्याची दखल 'पीएमओ'कार्यालयाने घेतली आहे. गुजरातच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी पिंपळगाव - बसवंत येथे दाखल झाले आहे.

Saam Tv

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला नाफेडचा कांदा घोटाळा आता थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. या घोटल्याची दाखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून चौकशीसाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांचं पथक नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव - बसवंतमध्ये दाखल झालं आहे. या पथकाने मंगळवारी नाफेडच्या कार्यालयात जाऊन 3 अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.

नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कोट्यावधीचा कांदा गैरव्यवहार प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. त्याची दाखल घेऊन गुजरातचे पथक अचानक पिंपळगाव - बसवंतमध्ये दाखल झाल्याने येथील नाफेडच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर तक्रारदार शेतकरी गोरख संत आणि पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान यांच्या कार्यक्रमात जाऊन थेट प्रश्न विचारणारी किरण सानप यांच्याशी देखील चर्चा केली. जवळपास 40 मिनिटे केलेल्या या चर्चेत अधिकाऱ्यांनी तक्रारीचे पुरावे देखील मागितले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

SCROLL FOR NEXT