83-year-old former MLA Narayan Munde vows to walk from Beed to Phaltan with a stick in hand, demanding justice for a woman doctor. Saam Tv
Video

महिला डॉक्टरला न्याय न मिळाल्यास ८३ वर्षांचे माजी आमदार काठीच्या आधारावर बीड ते फलटण पायी जाणार|VIDEO

Ex-MLA Narayan Munde: 83 वर्षांचे माजी आमदार नारायण मुंडे यांनी महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून उद्या लाक्षणिक उपोषण जाहीर केलं आहे. शासनाने योग्य पद्धतीने प्रकरण हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Omkar Sonawane

महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी 83 वर्षाचे माजी आमदार नारायण मुंडे उद्या दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच सरकारने जर हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावर जाण्याचा इशारा दिला आहे. माजी आमदार नारायण मुंडे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबाची हकीकत ऐकल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, ऊसतोड मजुराच्या वाघिणीची लांडग्याने शिकार केली. उद्या दिवसभर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. शासनाने या प्रकरणाला योग्य पद्धतीने हाताळले नाही तर मी बीड ते फलटण पायी 83 वर्षाचा माणूस पायी काठीच्या आधारावर जाणार आहे असं म्हणत माजी आमदार नारायण मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या लेकीसाठी टोकाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग; 4 माजी आमदार गळाला

Election Commission: देशातील कोणत्या १२ राज्यात होणार SIR 2.0; कोण-कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Alibaug Tourism : अलिबाग फिरायला गेलाय? मग 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की पाहा

Maharashtra Live News Update: बच्चू कडूंच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा

Health Tips: गुळ की मध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT