Pahalgam Terror Attack 
Video

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू, राज्यभरात हळहळ

Pahalgam Attack: मंगळवारी काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही दुर्दैवी बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

Dhanshri Shintre

काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा बळी गेला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. डोंबिवलीतील तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून सुरक्षादले सतर्क झाली आहेत.

डोंबिवलीतील जोशी, लेले आणि मोने कुटुंबातील तिघे पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. मात्र, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही कुटुंबांचे नातेवाईक डोंबिवलीतून काश्मीरकडे रवाना झाले आहेत. याच हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही मृत्यू झाला आहे. पनवेलमधील दिलीप डिसले यांचाही बळी गेला असून, महाराष्ट्रातील सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या डोंबिवलीतील नागरिकांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी प्रवास व संपर्कासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. शिवसेनेचे राजेश कदम, खासदार श्रीकांत शिंदे व सागर जेधे यांनीही सहकार्य केले आहे. शासनस्तरावरून तातडीने माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, डोंबिवलीतील अनेक संस्था व नागरिकांनी या अमानुष हल्ल्याचा जोरदार निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT