satara news saam tv
Video

Udayanraje Bhosale: कॉलर उडवत उदयनराजेंची नक्कल, ३ वर्षाच्या चिमुकल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल|VIDEO

Little Ojas Mimics Udayanraje Collar Flip: साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षाचा चिरंजीव ओजसने खासदार उदयनराजे यांच्यासमोरच हटके स्टाईलने कॉलर उडवली.

Omkar Sonawane

साताऱ्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खासदार उदयनराजे भोसले यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. दरवेळी उदयनराजे हे आपल्या अनोख्या स्टाईलनं कायम चर्चेत असतात. कधी राजकीय सडेतोड भूमिका असेल तर कधी चाहत्यांकडे पाहून त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल... यामुळे थोरांपासून अगदी लहानांपर्यंत उदयनराजेंची हटके क्रेझ कायमच सर्वांना पाहायला मिळते.

साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षाचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे. ज्यावेळी उदयनराजे त्याच्या समोर आले त्यावेळी त्याने उदयनराजेंना पाहून त्याच्या हटके स्टाईलने कॉलर उडवली आणि उदयनराजे जसे पुष्पाच्या डायलॉगवर आपल्या गालावरून हात फिरवतात तसे हात वारे केल्यामुळे उदयनराजे देखील आवाक झाले आणि त्याच्यासमोर त्यांनी हात जोडले. यानंतर या चिमुकल्याने उदयनराजेंना समोर ठेवलेले ड्रायफूट खायला दिले असता राजे सुद्धा ते ड्राय फ्रुट स्वतःच्या खिशात भरताना दिसत आहेत. यामुळे लहान मुलांबाबत देखील त्यांना चांगलीच आपुलकी असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सध्या या तीन वर्षाचा चिमुकला ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT