Kalyan News Saam Tv
Video

Mayor Election : उद्धव ठाकरेंना धक्का, शिदेंची गळ अन् ११ नगरसेवक नॉट रिचेबल, सत्तास्थापनेचा थरार शिगेला

11 Thackeray Sena corporators not reachable in KDMC : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा थरार शिगेला पोहोचला आहे. महापौरपदासाठी भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

Namdeo Kumbhar

KDMC Politics : कल्याण डोंबिवलीतील ठाकरेसेनेचे 11 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं सर्वत्रच खळबळ उडाली. याच 11 नगरसेवकांना शिंदेसेनेकडून गळ घालण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा थरार आता शिगेला पोहोचलाय. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही शिंदेसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. जोपर्यंत स्वतंत्र गट स्थापन होत नाही तोपर्यंत हे नगरसेवक नॉट रिचेबल राहणार असल्याचं समजतंय..(Kalyan Dombivli mayor post power struggle)

कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत असलं तरी महापौरपदासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना भाजपकडून ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चर्चा आहे .या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मात्र सावध पवित्रा घेतलाय. निवडून आलेले ११ नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवले असून गट स्थापनेनंतरच पुढची भूमिका स्पष्ट करू असं ठाकरे गटाचे नेते सचिन बासरे यांनी सांगितले. तसेच कोणताही नगरसेवक फुटलेला नाही सर्व नगरसेवक आमच्या पक्ष सोबतच आहेत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, पक्ष नेतृत्व आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते सचिन बासरे यांनी सांगितले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking! पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य; तरुणाला 2 किलोमीटर फरपटत नेलं|Video

Couple Ring Designs: गर्लफ्रेंडसाठी अंगठी खरेदी करताय? या आहेत 5 ट्रेंडिग डिझाईन्स

ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Live News Update: कंपनीतील सुरक्षेअभावी कामगाराचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Hair Care: पांढरे केस वाढल्यामुळे सतत केस डाई करायची सवय लागली आहे? मग होऊ शकतो 'हा' परिणाम

SCROLL FOR NEXT