सुगरण

आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू

सकाळ न्यूज नेटवर्क

सध्या एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकमध्ये कोणत्या वस्तू येतात याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय लवकरच एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकची व्याख्या स्पष्ट करणार आहे. सध्या 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यांच्या काही सूचना असल्यास त्यादेखील देता येणार आहेत. सध्या प्लास्टिकच्या हँडलवाल्या आणि बिना हँडलवाल्या बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे, ताटं याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताटं, खोटी फुलं, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल असं म्हटलं होतं.

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Web Title: One Time Use Plastic Ban In Indian From Mahatma Gandhi Jayanti 2 October

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

SCROLL FOR NEXT