स्पॉटलाईट

VIDEO | खडतर संघर्षातून मिळवलं खमंग यश महाशय धर्मपाल गुलाटी काळाच्या पडद्याआड......

साम टीव्ही

माहित आहे. याच एमडीएचचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी काळाच्या पडद्याआड गेलेत. अवघ्या 1500 रुपयांमध्ये त्यांनी उद्योगाचा वटवृक्ष उभा केलाय. टांगेवाला ते मसाल्याचा बादशाह.हा खडतर प्रवास कसा झालाय.

हे आजोबा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेत. पीळदार मिशा. काटस शरीर.  डोळ्यांत मायेचा पाझर आणि प्रचंड तेज असलेला हा चेहरा सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. यांचं नाव आहे महाशय धर्मपाल गुलाटी.  एमडीएच मसाले.  हो बरोबर ऐकलंत. याच प्रसिद्ध मसाला कंपनीचे ते संस्थापक. त्यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये झाला.  फाळणीनंतर ते भारतात आले. व्यवसायाच्या उर्मीमुळे शिक्षण पाचवीतच सोडलं आणि वडिलांसोबत एका दुकानात इवले इवले हात राबू लागले. काहीतरी भव्य करायचं हे स्वप्न त्यांना शांत बसू देईना. कसे-बसे पंधराशे रुपये जुळवले आणि दिल्लीत पाऊल ठेवलं. गुलाटी यांचा तिथून पुढचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.

दिल्लीत आल्या-आल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी 650 रुपयांचा टांगा विकत घेतला. नंतर ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतुबरोडदरम्यान टांगा चालवत होते. त्यातून पैसे साठवून अजमल खाँ रोडवर एमडीएच नावाने मसाल्याचे दुकान सुरू केले. आज गुलाटी यांच्या भारत आणि दुबईमध्ये मसाल्याच्या 18 कंपन्या आहेत. या कंपन्यांतून तयार होणारे MDH मसाले जगभरात प्रसिद्ध झालेत.

महाशय धर्मपाल गुलाटी यांनी व्यावसायिक रोपट्याचा वटवृक्ष केलाच, पण त्याचसोबत सामाजिक कार्यातूनही ते अनेकांचा आधारवड बनलेत. गोरगरिबांसाठी अनेक रुग्णालयं आणि शाळाही त्यांनी उभारल्यायत.  महाशय धर्मपाल हे जग सोडून गेलेत. पण ते फक्त शारीरिक आणि भौतिक रुपाने. त्यांनी उभं केलेलं औद्योगिक साम्राज्य, खडतर प्रवासातून मिळवलेलं यश अनेकांना प्रेरणा तर देईलच, पण, भारतासह जगभरातील स्वयंपाक घरांतून येणारा खमंग घमघमाट त्यांच्या कार्याला कायमच सलाम करत राहील. हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

Crop Insurance : पीक विम्याचे तीन लाखांवर अर्ज फेटाळले; शेतकऱ्यांच्या हाती निराशा

Physically Abused Case: महिलेकडून खोट्या अत्याचाराचा आरोप; कोर्टाने सुनावली ४ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT