Two youths in Satara Entetaining Corona Patients
Two youths in Satara Entetaining Corona Patients 
स्पॉटलाईट

रुग्णांच्या मनावरचा ताण घालविण्याचा सातारच्या दोन तरुणांचा सुरु आहे प्रयत्न

ओंकार कदम

सातारा : कोविड Covid रुग्ण बरे होण्यात अडथळा ठरतो तो मानसिक ताण, चिंता आणि भीती. साताऱ्यात Satara एका कोविड सेंटरमध्ये दोन युवक दाखल असलेल्या रुग्णांचे मनोरंजन Entertainment करुन त्यांच्या मनावरचा ताण घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. Satara Youths Entertaining Patients in Covid Centre

सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचा Corona आकडा हा कमी व्हायचे नाव घेत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. सातारा शहरात आमदार शिवेंद्रराजेंनी Shivendraraje स्वतः च्या मंगल कार्यालयात स्वखर्चाने कोविड सेंटर उभे केले आहे. या सेंटर मध्ये सुद्धा रुग्ण अॅडमिट आहेत. कोविड  म्हणलं की रुग्ण हा भीतीनेच निम्मा झालेला असतो. त्याला मानसिक आधार द्यायला कोणाला जवळ सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे नातेवाईक आणि रुग्ण दोघेही चिंताग्रस्त असतात. 

हे देखिल पहा-

परंतु साताऱ्यातील पुष्कर मंगल कार्यालयात आमदार शिवेंद्रराजेंनी सुरू केलेल्या कोविड सेंटर मधील एक व्हीडीओ सध्या सगळ्याच लक्ष वेधून घेत आहे. या व्हीडीओ मध्ये दोन पीपीई किट घातलेले तरुण कोविड सेंटर मध्ये चक्क रुग्णांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यावर नाचून ते रुग्णांना मानसिक आधार देताना दिसत आहेत. Satara Youths Entertaining Patients in Covid Centre

विशेष म्हणजे अस्वस्थ असलेल्या रुग्णांना सुद्धा त्यांच्या या अनोख्या डान्स मुळे स्वतः ठेका धरायचा मोह आवरत नाही आणि काही रुग्ण सुद्धा या गाण्यावर ठेका धरताना या व्हिडिओत दिसतात. सध्या कोरोना बाधित रुग्ण म्हणलं की लोक नाकं मुरडतात. परंतु, साताऱ्यातील पुष्कर कोविड सेंटर मधील या व्हीडीओने नक्कीच लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला मदत होईल यात शंका नाही
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT