स्पॉटलाईट

कोरोनामुळे राज्यात एका दिवसांत सुमारे 6 टन कचरा, या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी?

साम टीव्ही

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे आता जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. राज्यात गेल्या १५ दिवसांत जैववैद्यकीय कचऱ्यात दुपटीने वाढ झालीय.

कोरोनामुळे राज्यभरात सध्या एका दिवसांत सुमारे ६ टन कोविड जैववैद्यकीय कचरा निर्माण होतोय. गेल्या १५ दिवसांत त्यात दुपटीने वाढ झालीय. सुरुवातीला जैववैद्यकीय कचऱ्यात घनकचराही मिसळला जात होता. मात्र, त्यावर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलंय. त्यामुळेच रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाच्या तुलनेत कोरोनाच्या जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये मोठी वाढ झाली नसल्याचा दावा प्रशासनानं केलाय.  

एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत राज्यात सुमारे ३ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला, तो आकडा आता ६ टनांवर गेलाय. १६ एप्रिलला राज्यात ६ हजार ३०१ किलो जैववैद्यकीय कचरा जमा झाला. या काळात कोरोना रुग्णांच्या प्रमाणात ६ पटीने वाढ झालीय. 
मुंबई शहरात २३६१.८५ किलो, मुंबई उपनगरात ४५४.४० किलो, ठाण्यात ८०४.७३ किलो, पुण्यात ७०३.८६ किलो, नागपुरात ९९६.४० किलो, सांगलीत १५९.९१ किलो तर अहमदनगरमध्ये १६२.७० किलो जैववैद्यकीय कचरा गोळा झालाय. 

घनकचऱ्यात जैववैद्यकीय कचरा मिसळल्यास ते आरोग्य व्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे या संकलनाबाबत रुग्णालयं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणा, संकलन कर्मचारी या सर्वानीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच, कोरोनासंबंधित जैववैद्यकीय कचरा संकलकांनादेखील आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्र सरकारच्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळावं, अशी मागणी जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट केंद्राच्या देशपातळीवर संघटनेनं केलीय.

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT