Yedeshwari Sugar Factory  
स्पॉटलाईट

मुसळधार पावसाने येडेश्वरी कारखान्यातील 30 हजार पोते साखर भिजली !

- सिद्धेश सावंत

बीड - बीड Beed जिल्ह्यात यंदा मान्सूनने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस Rain पडला आहे. त्यामुळे अनेक नद्या River आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. Heavy rains soaked 30,000 bags of sugar in Yedeshwari factory 

मात्र असे असताना एकीकडे याच मुसळधार पावसाने, बीडच्या केज Kej तालुक्यात असणाऱ्या, येडेश्वरी Yedeshwari सहकारी साखर Sugar कारखान्यातील Factory तब्बल 30 हजार साखरेची पोती भिजली आहेत. त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान Damage झाले आहे.

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या आनंदगाव येथील, येडेश्वरी साखर कारखान्याने 6 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते. दोन दिवसांपूर्वी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे येडेश्वरी कारखान्याचा परिसरात पाणीच पाणी झाले.

हे देखील पहा -

यामुळे कारखान्याच्या 1 लाख 73 हजार 208 क्विंटल साखर साठवणुकीची क्षमता असणाऱ्या गोदामात पाणी शिरले. या पाण्यात गोदामातील 30 हजार पोते म्हणजे तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. गोदमातील पाणी काढण्यासाठी 40 ते 50 कर्मचारी प्रयत्न करत होते. मात्र 35 मिनिटात तब्बल 130 मिमी इतका पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गोदामात जमा झाले होते. त्यामुळे पाणी बाहेर काढायला अडचणी आल्या अशी माहिती गोदाम व्यवस्थापकांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT