Beauty Tips : डोळ्यांखाली डार्क सर्कल अन् सुरकुत्या आल्यात? रात्री डोळ्यांखाली हे तेल लावा, त्वचा होईल चमकदार

Saam Tv

डार्क सर्कलस

अपुरी झोप, थकवा, स्ट्रेस, सतत स्क्रिनचा वापर यांमुळे डोळयांभोवती डार्क सर्कलस येण्यास सुरूवात होते. डार्क सर्कलस घालवण्यासाठी कोणती महागडी ट्रिटमेंट न करता, काही घरगुती उपाय करून ही वर्तुळ सहज गायब करू शकता.

dark circles care tips . | meta ai

असे तयार करा मिश्रण

एका वाटीत १ चमचा कोरफड जेल, १ चमचा बदाम तेल आणि अर्धा चमचा एरंडेल तेल ( कॅस्टर ऑईल ) एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५-३० दिवसांत त्वचा चमकदार आणि घट्ट दिसेल.

dark circles care tips | dark circles care tips

रात्री मिश्रण चेहऱ्याला लावा

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. हे मिश्रण हलक्या हाताने डार्क सर्कल्सवर १ ते २ मिनिटे मसाज करत लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी उठून चेहरा धुवा.

dark circles care tips | pintrest

त्वचेला खोलवर ओलावा

कोरफडीमध्ये थंडावा आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते。हे डोळ्यांखालील कोरडेपणा दूर करून त्वचा मऊ ठेवते.

aloe-vera-oil | pintrest

काळी वर्तुळे कमी करणे

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.हे घटक त्वचेचा काळेपणा हलका करण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत करतात.

almond oil | pintrest

त्वचेचा पोत सुधारणे

एरंडेल तेल त्वचेत कोलेजन वाढवण्यास मदत करते.त्यामुळे डोळ्यांखालील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात.

castor oil | pintrest

सुज कमी करणे

या मिश्रणाने हलक्या हाताने मसाज केल्यास डोळ्यांखालील सूज आणि पफीनेस कमी होतो.

puffiness of eyes | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

DOCOTR.jpg | meta ai

Skincare Tips : सीरम लावताना 'ही' चूक करताय? ग्लोईंग स्किनसाठी जाणून घ्या खास ब्युटी टिप्स

Skincare Tips | meta ai
येथे क्लिक करा