Skincare Tips : सीरम लावताना 'ही' चूक करताय? ग्लोईंग स्किनसाठी जाणून घ्या खास ब्युटी टिप्स

Saam Tv

सीरम महत्त्वाचे

त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्याठी स्किन केअर मधील सीरम हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु आपल्याला ते लावण्याची योग्य पद्धत माहित नसते म्हणून चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही.

Skincare Tips | pintrest

चेहरा स्वच्छ धुवा

सीरम लावण्याच्या आधी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरडा पुसून घ्या. टोनर लावल्यानंतरच सिरमचा वापर करावा.

Skincare Tips | pintest

सीरम खराब होईल

मर्यादित प्रमाणात सीरमचा वापर करावा.नेहमी ड्रॉपरच्या मदतीने २,३ थेंबच लावा. ड्रापरचा थेट स्पर्श चेहऱ्यावर करु नये, त्यामुळे सीरम खराब होण्याची शक्यता असते.

Skincare Tips | pintrest

हलक्या हाताने लावा

सीरम चेहऱ्यावर जोरात चोळू नका. व्यवस्थित तळहातावर घेऊन बोटांनी चेहऱ्यावर टॅप करा.

Skincare Tips | pintrest

मॉश्चराईजरने सीरम लॉक करा

सीरम लावल्यावर १ ते २ मिनिटांनी त्यावर मॉश्चराईजर लावून लॉक करा. त्यामुळे त्वचा अधिक हायड्रेटेड राहते.

Skincare Tips | pintrest

सीरम उन्हात वापरताना

उन्हात जाताना जर तुम्ही सीरम लावत असाल तर त्यावर मॉश्चराईजर लावायला विसरू नका, नाहीतर त्वचा काळी पडू शकते.

Skincare Tips | pintrest

सीरम लावण्याची योग्य वेळ

सीरम सकाळी किंवा संध्याकाळी लावल्याने अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे सीरमची योग्य वेळ पाळा.

Skincare Tips | pintrest

या चुका टाळा

सीरम चेहरा धुतल्यानंतर आणि टोनर लावल्यानंतर, पण मॉश्चराईजर लावण्यापुर्वी वापरावे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सीरम त्वचेच्या आत जात नाही.

Skincare Tips | pintrest

जास्त प्रमाणात सीरम लावणे

जास्त सीरम लावल्याने चेहरा अधिक उजळतो अस अजिबात नाही. केवळ २ ते ३ थेंब संपूर्ण चेहरा आणि मानेसाठी पुरेसे असते.

Skincare Tips | pintrest

Glowing Skin Tips: महागडे स्किन केअर नको; तर 'हे' ज्यूस देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो

best juices for glowing skin (8).jpg | meta ai
येथे क्लिक करा